Log in" दीपावली नक्षत्रांचे देणे "

दिवाळीचे निमित्त साधून इंडो-स्विस सेंटर, इंडियन म्युझिक सर्कल आणि बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड यांनी एकत्रितपणे श्री. सुरेश भट यांच्या लेखणीतून अवतरलेल्या रचनांवर आधारित मराठी भावगीते व गजलांची मैफिल आयोजित करत आहोत. या मैफिलीचे वैशिष्ट्य असे कि यात सहभागी होणारे सगळेच कलाकार हे आपल्यातलेच "स्वित्झर्लंडवासी कलाकार" असणार आहेत.

आपल्या या गुणी कलाकारांचे कौतुक व्हावे आणि दर्दी श्रोत्यांना एक अविस्मरणीय अनुभव मिळावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

याचबरोबर १२ वर्षाखालील मुलांकरता कागद रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कागद रांगोळी म्हणजे हस्तकलेचा कुठलाही नमुना. कापून, चिटकवून अथवा रंगवलेला कागद घरी बनवून आणणे अपेक्षित आहे.  

कलाकार :

तबला : श्री. श्रीरंग मिरजकर, श्री. निमिष आठल्ये.

पेटी : श्री. संतोष घंटे (पुणे)

गायिका : डॉ. बिजयश्री सामल, स्नेहल फाटक, मेघा पालकर, सोनल पेंढारकर कुलकर्णी, रेणुका लांबे.

गायक : श्रेयस जोगळेकर, सागर जोशी, गणेश काळे, नितीन उगले.

कविता वाचन : पूनम श्याम, स्नेहाली महाजन आणि गोविंद सोवळे.

झुरिक  

दिनांक : २६ ऑक्टोबर २०१९, शनिवार.

वेळ : ४ ते ७ (२० मिनिटांचा मध्यंतर).

ठिकाण :  Limmatstrasse 114, 8005 Zurich.

जिनिव्हा

दिनांक : ०३ नोव्हेंबर २०१९, रविवार.

वेळ : २ ते ५ (२० मिनिटांचा मध्यंतर).

ठिकाण :  "Espace de quartier Le 99",

                        Rue de Lyon 99, 1203 Geneva

 Tickets/Registration  

 Send the payment By Twint to 

+41 79 930 16 08

 Geneva Event, Register here

Geneva - दीपावली २०१९ : नक्षत्रांचे देणे

तिकीट दर : २० CHF फक्त. (१२ वर्षांखालील मुलांना प्रवेश मोफत)

आपल्या कलाकारांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि मैफिलीचा आनंद घेण्यासाठी जरूर या.  

****

महाराष्ट्रीयन पदार्थांचा आस्वाद.

कार्यक्रमाआधी, मध्यंतरात आणि कार्यक्रमा नंतर विविध चटपटीत पदार्थांचा आस्वाद आपण घेऊ शकाल. त्यासाठी फूड स्टॉलची सोय करण्यात येईल.

****

आकाशकंदील कार्यशाळा.

आई-वडील कार्यक्रमाचा आनंद घेत असताना मुलांच्या मनोरंजनाची पण सोय हवीच !

लहान-मोठ्या सर्वच मुलांसाठी खास दिवाळीनिमित्त आकाशकंदील बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल. त्यासाठी नावनोंदणी मात्र आवश्यक आहे. प्रत्येकी ५ CHF आकारण्यात येतील. जे कार्यशाळेच्या ठिकाणी द्यायचे आहेत.

****

दिवाळीची खरेदी.

होय आम्हाला याची पूर्ण कल्पना आहे कि आपल्या कार्यक्रमाच्या दुसऱ्याच दिवशी लक्ष्मीपूजन आहे. कार्यक्रम बघून त्यानंतर खरेदीला जायचे तर तुमची धावपळ नक्कीच होणार. त्यासाठी एकाच ठिकाणी आकाश कंदील, पणत्या, रांगोळी, हळद-कुंकू, उटणं, चकलीची भाजणी, अनारस्याचे पीठ, फराळाचे पदार्थ आणि खास दिवाळीनिमित्त भेट देण्यासाठी अथवा स्वतः आस्वाद घेण्यासाठी गोडाचे पदार्थ या आणि अशा अनेक गोष्टी मिळण्याची सोय करत आहोत.

****

 झुरिक ला कार्यक्रम दिवाळीच्या आधी असल्याने, आकाशकंदील कार्यशाळा व दिवाळीची खरेदी फक्त झुरिक मधेच आहे.

याच कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २ नोहेंबर रोजी जिनिव्हा येथे पण करण्यात येणार आहे.

****

धन्यवाद.

 Forthcoming BMMS Events

(Details coming soon)

20 Oct 2019 

- Monthly AtharvaShirsha

26 Oct 2019/03 Nov 2019

- Diwali Celebration

17 Nov 2019

- Monthly AtharvaShirsha

15 Dec 2019

- Monthly AtharvaShirsha

18/19 Jan 2020

- Makar Sankrant 

28/29 March 2020

- Gudhi Padwa

03 May 2020

- Maharashtra Diwas + AGBM

29/30 August 2020

- Ganesh Utsav