Log in


Geneva - दीपावली २०१९ : नक्षत्रांचे देणे

  • 3 Nov 2019
  • 11:30 AM - 5:00 PM
  • "Espace de quartier Le 99", Rue de Lyon 99, 1203 Geneva

Registration

(depends on selected options)

Base fee:

Registration is closed


" दीपावली नक्षत्रांचे देणे "

दिवाळीचे निमित्त साधून इंडो-स्विस सेंटर, इंडियन म्युझिक सर्कल आणि बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड यांनी एकत्रितपणे श्री. सुरेश भट यांच्या लेखणीतून अवतरलेल्या रचनांवर आधारित मराठी भावगीते व गजलांची मैफिल आयोजित करत आहोत. या मैफिलीचे वैशिष्ट्य असे कि यात सहभागी होणारे सगळेच कलाकार हे आपल्यातलेच "स्वित्झर्लंडवासी कलाकार" असणार आहेत.

आपल्या या गुणी कलाकारांचे कौतुक व्हावे आणि दर्दी श्रोत्यांना एक अविस्मरणीय अनुभव मिळावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

याचबरोबर १२ वर्षाखालील मुलांकरता कागद रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कागद रांगोळी म्हणजे हस्तकलेचा कुठलाही नमुना. कापून, चिटकवून अथवा रंगवलेला कागद घरी बनवून आणणे अपेक्षित आहे.  

कलाकार :

तबला : श्री. श्रीरंग मिरजकर, श्री. निमिष आठल्ये.

पेटी : श्री. संतोष घंटे (पुणे)

गायिका : डॉ. बिजयश्री सामल, स्नेहल फाटक, मेघा पालकर, सोनल पेंढारकर कुलकर्णी, रेणुका लांबे.

गायक : श्रेयस जोगळेकर, सागर जोशी, गणेश काळे, नितीन उगले.

कविता वाचन : पूनम श्याम, स्नेहाली महाजन आणि गोविंद सोवळे.

तिकीट दर : २० CHF** फक्त. (१२ वर्षांखालील मुलांना प्रवेश मोफत)

मंडळाच्या ज्या सभासदांनी कार्यक्रमाचे तिकीट घेतले आहे त्या सभासदांना मंडळातर्फे फूड स्टॉल करता कूपन देण्यात येणार आहे.

दिनांक : ०३ नोव्हेंबर २०१९, रविवार.

वेळ : २ ते ५ (२० मिनिटांचा मध्यंतर).

ठिकाण :  "Espace de quartier Le 99", Rue de Lyon 99, 1203 Geneva

आपल्या कलाकारांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि मैफिलीचा आनंद घेण्यासाठी जरूर या.  

****

महाराष्ट्रीयन पदार्थांचा आस्वाद.

कार्यक्रमाआधी, मध्यंतरात आणि कार्यक्रमा नंतर विविध चटपटीत पदार्थांचा आस्वाद आपण घेऊ शकाल. त्यासाठी फूड स्टॉलची सोय करण्यात येईल.

**** 

झुरिक ला कार्यक्रम दिवाळीच्या आधी असल्याने, आकाशकंदील कार्यशाळा व दिवाळीची खरेदी फक्त झुरिक मधेच आहे.

धन्यवाद.