नमस्कार मंडळी,
गणपती ला अजून जरी वेळ असला तरी सुट्टी संपल्यावर लगेचच येतायत आणि सुट्टीला आपल्यापैकी बरेच लोक भारतात असतील म्हणून पुढचा कार्यक्रम आत्ताच जाहीर करत आहोत जेणेकरून २५ ऑगस्ट २०२४ तुम्हाला आत्तापासूनच ब्लॉक करता येईल
रविवार दिनांक २५ ऑगस्ट २०२४ रोजी गणपतीची मूर्ती बनवण्याचे वर्कशॉप आणि त्याच दिवशी बृहन महाराष्ट्र मंडळाच्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात पुढच्या पिढीतर्फे होणाऱ्या लेझीमची प्रॅक्टिस असे दोन कार्यक्रम होतील.
कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे आहे.
सकाळी ९ ते दुपारी १२ : गणेश मूर्ती वर्कशॉप (फक्त १२ वर्षांवरील १२ नोंदणीकृत मुलांसाठी )
स्थान: KJAD, Storchengasse 14 , Dūbendorf
कार्यक्रमाचे शुल्क (गणपती मुर्ती कार्यशाळेसाठी)
१) सर्व समावेशक सदस्य : मोफत
२) कौटुंबिक सदस्य : पहिले मूल ५ CHF , दुसरे मूल १५ CHF
३) सदस्य नसलेले : १५ CHF
BMMS चे सभासदत्व घेऊन सभासदांना असलेल्या सवलतीचा लाभ घ्यावा ही विनंती.