१६३०: छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म.
रयतेचा राजा असं म्हटलं की समोर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं कुठलं नाव येत नाही. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपतींनी रचला आणि त्यापुढे जाण्याची कोणाची टाप नाही. महाराज समजून घ्यायला हवेत आणि ते समजण्यासाठी महाराजांचा इतिहास समजून तो आपल्या जीवनाशी जुळवून घेता आला पाहिजे त्यातूनच तुम्ही आयुष्याची लढाई लढण्यासाठी सिद्ध होऊ शकतात.
शिवाजी हे नाव घेताच डोळ्यासमोर येते ते दणकट शरीर, बुद्धिमान, शौर्य व धैर्याची मूर्ती एक महान देशभक्त आणि कुशल प्रशासक. त्यांचे पुर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले. मराठी साम्राज्याचे संस्थापक उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता , सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर महत्वपूर्ण ठसा उमटवला. शिवाजी महाराज हे स्वतः धर्मनिष्ठ हिंदू राजे होते.
अशाच महान राजाचा जन्म १९ फेब्रुवारी १९३० मध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवाई देवीच्या नावावरून महाराजांचे “शिवाजी” असे नामकरण करण्यात आले. पहिली गुरु आई आणि दुसरे गुरु दादोजी कोंडदेव यांच्या सान्निध्यात आणि संस्कारात महाराजांचे बालपण अतिशय उत्तम रितीने गेले. दादोजींनी त्यांना युध्द कौशल्यात आणि नितिशास्रात पारंगत केले. महाराज लहानाचे मोठे शिवनेरीत येथे झाले. शिवनेरी सोबतची माहुली व पुणे येथे देखील त्यांचे बालपण गेले.
जिजामाता सारखाच शिवाजी महाराजांमध्ये कणखरपणा, देशासाठी असलेले प्रेम आणि कठीण प्रसंगातून बाहेर येण्याचे ध्येय होते. अशा गुणांमुळे शिवाजी तयार झाले. “स्वराज्य म्हणजे स्वताचे राज्य.” महाराजांना वाटू लागले जर आपल्याला आपल्या स्वराज्याचे रक्षण करायचे असेल तर त्यासाठी गड किल्ले आपल्या ताब्यात असले पाहिजे. ही जाणीव त्यांना लहानपणापासून होती.
६ जून १६७४ ला गागाभट्ट यांनी हिंदू परंपरेनुसार अनेक ज्येष्ठांच्या अणि श्रेष्ठांच्या उपस्थितीने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला. त्यांनी शिवराई हे चलन शुरू केले. धर्माच्या नावाखाली त्यांनी काहीही कुणासोबत पक्षपात केला नाही. त्यांच्या दरबारातील काही अधिकारी आणि अंगरक्षक मुस्लिम समुदायाचे होते. त्यांनी कधीही कुठल्याही स्त्रीचा अनादर केला नाही. शत्रूच्या स्त्रियांना देखील सन्मानपूर्वक परत पाठवत असत.
१९०६: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री गुरूजी यांचा जन्म.
माधव गोळवलकर हे भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी संघटनेचे द्वितीय सरसंघचालक होते. इ.स. १९४० – इ.स. १९७३ या काळात त्यांनी संघाचे पोषण आणि संवर्धन केले, त्याला भक्कम अखिल भारतीय आकार दिला. संघाची विचार प्रणाली त्यांनीच सूत्ररुपाने सांगितली. समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात त्यांनी अनेक संस्था-संघटनांना सतत प्रेरणा दिली. श्रीगुरुजींचे जीवन अलौकिक आणि ऋषितुल्य होते. राष्ट्रजीवनाच्या विविध अंगाबाबत त्यांनी मूलभूत आणि क्रियाशील मार्गदर्शन केले. श्रीगुरुजी सर्वार्थाने राष्ट्रऋषी होते.
१९१५: थोर समाजसेवक, काँग्रेसचे अध्यक्ष, संसदपटू, भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) संस्थापक नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे निधन.
नामदार गोपाळ कृष्ण गोखले (मे ९, १८६६ - फेब्रुवारी १९, १९१५) हे भारतामधील ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध कायदेशीर राजकारणाच्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्याचा पाया घालणाऱ्या राजकीय व सामाजिक नेत्यांपैकी एक होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आघाडीचे नेते व भारत सेवक समाज या संस्थेचे संस्थापक होते. मोहनदास करमचंद गांधी हे गोखल्यांचे शिष्य समजले जातात. 1885 ते 1905 राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतर चा पहिला कालखंड होता. तो मवाळमतवादी कालखंड म्हणून ओळखला जातो.
या काळातील मवाळ मतवादी गटाचे अग्रणी नेते म्हणून गोपाळकृष्ण गोखले हे ओळखले जातात. महात्मा गांधींनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करताना गोपाळकृष्ण गोखले यांना आपले गुरु मानले. गोपाळ कृष्ण गोखले हे कुशल राजकारणी होते. राजकारणाच्या प्रति त्यांचा दृष्टिकोण उदारमतवादी होता. राजकीय आणि सामाजिक परिवर्तन घडवून आणावयाचे असेल तर घटनात्मक मार्गाचाच अवलंब केला पाहिजे असे त्यांचे स्पष्ट मत होते.
‘राजकारणाचे अध्यात्मीकरण’ ही अतिशय वेगळी (परंतु कोणत्याही स्तरावरील, क्षेत्रातील राजकारणात सर्वकाळ अत्यावश्यक असणारी) संकल्पना त्यांनी भारतात मांडली. राजकारण हे साधन शुचितेला महत्त्व देऊन, सेवाभावाने करायचे विशेष कार्य आहे, असे त्यांचे ठाम मत होते. चारित्र्य, नैतिकता, नि:स्वार्थी वृत्ती या सद्गुणांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला, स्वतःचे आदर्श उदाहरणही तत्कालीन नेत्यांसमोर व जनतेसमोर ठेवले.संपूर्ण आयुष्य राजकारणात राहूनही ’राजकारण’ न करता विशुद्ध सार्वजनिक जीवन जगणाऱ्या या महाराष्ट्राच्या सुपुत्राचे वयाच्या अवघ्या ४९व्या वर्षी निधन झाले.
१९९७: संगीतकार राम कदम यांचे निधन.
राम कदम यांचा जन्म ऑगस्ट १९१६ रोजी झाला. राम कदम हे मुळचे जिल्हा सांगली मधील मिरज गावाचे रहिवासी होते. राम कदम यांची चित्रपट कारकीर्द पुण्यामध्ये असलेल्या प्रभात फिल्म्समधील एक ऑफिस बॉय म्हणून झाली होती.राम कदम एक लावण्या गाण्यासाठी नावाजलेले संगीतकार म्हणून प्रसिद्ध होते. तसेच त्यांनी चित्रपट माध्यमातूनही आपल्या संगीताचा ठसा उमठवला आहे. राम कदम यांनी १९४० ते १९९० या कालावधीत मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
राम कदम यांनी जवळजवळ २०० चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत, परंतु त्यांनी जास्तीत जास्त लावण्याच गायल्या आहेत.राम कदम यांनी १९७२ मध्ये पिंजरा चित्रपटांसाठी गायलेली लावणी खूप गाजली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक व्ही. शांताराम होते.राम कदम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या वतीने राम कदम पुरस्कार दिला जातो.राम कदम १९ फेब्रुवारी १९९७ रोजी स्वर्गवासी झाले.
संदर्भ
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A4%AE
https://krantidev.com/shivaji-maharaj-information-in-marathi/
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0#:~:text=%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5%20%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0%20%E0%A4%B9%E0%A5%87%20%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%20%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF,%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87%20%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF%20%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%20%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%87.&text=%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AD%E0%A5%A9%20%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4%20%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87,%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80%20%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%20%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%20%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%80.
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3_%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%96%E0%A4%B2%E0%A5%87