
सर्व प्रथम सर्वांना नमस्कार. !!!
गेल्या वर्षी तुम्ही सर्वांनी BMMS. च्या गुढीपाडवा समारंभात जल्लोषच्या संकल्पनेचे जोरदार स्वागत केलेत. त्याबद्दल सर्वांचे आभार.
तुमच्या कौतुकामुळे या वर्षी BMMS gen next पुढची पिढी आणि BMMS तरुण तुर्क जल्लोष एकत्रीत सादर करणार आहेत. हा कार्यक्रम असणार आहे १८ मे २०२५ ला झुरिच मध्ये .
कार्यक्रमाचे स्वरूप :
- पहिल्या सत्रात पुढची पिढी कार्यक्रम सादर करेल ( साधारण ७५ मिनिटे)
- दुसऱ्या सत्रात तरुण तुर्क ( साधारण ७५ मिनिटे ) .
- तसेच यावर्षी पहिल्यांदाच जल्लोष मध्ये दोन्ही ग्रुप्स साठी हस्तकला , शिल्पकला , आणि चित्रकला प्रदर्शन ही असेल
जल्लोष म्हणजे BMMS च्या तरुण पिढीचे स्नेहसंमेलन. त्यामुळे त्याला अनुसरून सादरकर्त्यांसाठी निकष ठरवण्यात आले आहेत . जे पुढील प्रमाणे आहेत
१) परफॉर्मन्स चे स्वरूप:
कार्यक्रम BMMS चा असल्याने अर्थातच परफॉर्मन्स मराठीत असेल तर उत्तमच . परंतु त्याचवेळी पार्टिसिपेशन महत्वाचे म्हणूनच Performances साठी कुठल्याही भाषेचे बंधन ठेवलेले नाही.
त्यामुळे भारतीय पारंपरिक गाणे किंवा नृत्येच हवीत असे नाही. "हे विश्वची माझे घर " या उक्तीला धरून कुठलेही वाद्य, परदेशी किंवा भारतीय कुठल्याही शैलीचे नृत्य गाणे , juggling , जादूचे प्रयोग, कुठल्याही प्रकारचे नावीन्यपूर्ण फ्युजन किंवा इतर कौशल्य अश्या endless possibilities सह हा टॅलेंट शो सादर होईल. निवेदन मात्र मराठीतव असेल
२) वयोमर्यादा:
BMMS gen next पुढची पिढी ग्रूप - १८ मे २०२५ रोजी कमीत कमी १२ वर्षे पूर्ण ते १८ वर्षे .
BMMS तरुण तुर्क ग्रूप - १८ मे २०२५ ला वय वर्षे कमीत कमी १८ पूर्ण आणि लीड परफॉर्मर तरुण तुर्क ग्रुप चा सदस्य असणे बंधनकारक ( ग्रुप जॉइन करताना वयो मर्यादा १८ ते ३५ वर्षे आहे. ग्रुप विनामूल्य आहे )
३) मराठीशी संबंध :
ग्रूप परफॉर्मन्स मध्ये निदान ५० % मुलांचे निदान एकतरी पालक महाराष्ट्रीयन किंवा मराठी बोलू शकणारी हवीत . ज्या परफॉर्मन्स मध्ये लीड परफॉर्मर आहे त्याचे / तिचे एकतरी पालक मराठी/ मराठी बोलू शकणारी असावीत
या ही वर्षी विद्यार्थी कलाकारांना ( स्टेज परफॉर्मर / कला प्रदर्शनात सहभागी तसेच ठराविक संख्येपर्यंत स्वयंसेवकांना ) प्रवेश फी नाही )
त्यातून कोणाला प्रश्न असतील तर जरूर विचारावेत अजून एक महिना आहे त्यामुळे कलाकारांनो , सुरु करा तयारी
परफॉर्मन्स साठी नाव नोंदणी :
BMMS पुढची पिढी Gen Next - श्रीपाद छत्रे (+41 76 725 39 07)
BMMS तरुण तुर्क - ऐश्वर्या भांगे (WhatsApp Only +91 89753 19472)
नोट - स्टेज परफॉर्मर च्या नोंदणी पूर्ण झाली आहे परंतु कला प्रदर्शन आणि स्वयंसेवक यांची नोंदणी स्वीकारली जात आहे.
PS: All attendees should bring their own water bottle !