बृहन महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंड (BMMS) आयोजित मकर संक्रातीच्या कार्यक्रमात!
हळदी-कुंकू, बोरन्हाण, करमणुकीचे कार्यक्रम, तुमच्या जोडीदाराबरोबरची धम्माल आणि पॉटलकमधील सुग्रास भोजनाचा आनंद घेण्यासाठी त्वरित रजिस्टर करा!
दिनांक: शनिवार, २५ जानेवारी २०२५
ठिकाण: Av. Villamont 13, 1005 Lausanne, Switzerland
वेळ: दुपारी १२:३० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत
✨ कार्यक्रमाची रूपरेषा:
दुपारी १२:३० - स्वागत
दुपारी १:०० - हळदी-कुंकू, वाण, बोरन्हाण
दुपारी १:३० - करमणुकीचे कार्यक्रम
दुपारी २:०० - विशेष आकर्षण - "मला उमजलेले बाकीबाब", कवी पद्मश्री बा. भ. बोरकर (बाकीबाब) कवितांचा स्वरमय आस्वाद. प्रेम, निसर्ग, अध्यात्म अशा जीवनातील अनेक पैलूंवर भाष्य करणाऱ्या त्यांच्या कवितांचा आस्वाद घेऊया त्यांनी स्वतः लावलेल्या चालींसोबत! सादरकर्ते श्रेयस जोगळेकर आणि मेघा पालकर.
दुपारी २:३० - जोडीदारांच्या साथीने स्पर्धा, लहान मुलांच्या स्पर्धा
दुपारी ४:०० ते ५:३० - जेवण आणि गप्पा
संध्याकाळी ५:३० - कार्यक्रमाची समाप्ती आणि आवरा आव
रजिस्ट्रेशन फी (प्रत्येकासाठी):
सभासद : ५ स्विस फ्रँक्स (सभासद कुटुंबाकरता)
इतर : १० स्विस फ्रँक्स
बोरन्हाण: ५ स्विस फ्रँक्स
पॉटलकसाठी:
सहभागी होणाऱ्या कुटुंबांनी पदार्थांचे नियोजन करण्यासाठी दीप्ती पाटील (जिनेव्हा) आणि वृषाली केळकर (लौझान) यांच्याशी संपर्क साधावा.
पॉटलकमध्ये भाग घेणे शक्य नसल्यास, प्रत्येकी १० स्विस फ्रँक्स अतिरिक्त फी देऊन सहभागी होता येईल.
चला, मकर संक्रांती एकत्र साजरी करूया!