हिंदू नवीन वर्षाची सुरुवात उत्साहात करण्यासाठी मंडळाने आयोजित केलेल्या गुढीपाडव्याच्या कार्यक्रमात या वर्षी आपण संपन्न ,गुणी, प्रगल्भ अभिनेते शरद पोंक्षे यांना आमंत्रित केले आहे.
त्यांच्या आयुष्यातील विविध अनुभव, अडचणी , वादळ, त्यांचा सर्व प्रवास या सर्वांविषयी त्यांच्याच ओघवत्या शैलीतून जाणून घेण्यासाठी २३ मार्च २०२५ रोजी आपण नक्की भेटूया.
सोबत मंडळाचा गुढी पूजन कार्यक्रम असेल.
शुल्क
सर्वसमावेशक सभासद: निःशुल्क
कौटुंबिक अथवा वैयक्तिक सभासद १२ वर्षांवरील मुले आणि प्रौढ : २० स्विस फ्रँक्स
इतर प्रेक्षक (पाहुणे व आप्तजनांसह) १२ वर्षांवरील मुले आणि प्रौढ: ३० स्विस फ्रँक्स
६-१२ वयोगटातील मुले: ५ स्विस फ्रँक्स
६ वर्षांखालील मुले: निःशुल्क
नाश्त्याची सोय ऐच्छिक
बृहन महाराष्ट्र मंडळ स्विझर्लंड