गुढीपाडवा व शिवजयंती सोहळा २०२६ – जिनिव्हा
शालिवाहन शके १९४८
हिंदू नववर्ष आणि शिवजयंतीच्या निमित्ताने जिनिव्हामध्ये सादर होत आहे एक विशेष ऐतिहासिक कार्यक्रम —
“श्वासात राजं, ध्यासात राजं”
२७ मार्च २०२६ (शुक्रवार)
सायं. ६:३० वाजता
Restaurant scolaire de Le 99, Rue de Lyon 99, 1203 Genève
“श्वासात राजं, ध्यासात राजं” हा एक अनोखा परफॉर्मेटिव्ह रीडिंग कार्यक्रम असून स्वराज्य उभारण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या शूरवीरांच्या प्रेरणादायी कथा जिवंत करतो. शब्द, आवाज आणि भावनांच्या माध्यमातून इतिहास अनुभवण्याची ही एक हृदयस्पर्शी संधी आहे.
मान्यवर कलाकार: दिग्पाल लांजेकर · अजय पुरकर · अवधूत गांधी · मृणाल कुलकर्णी
लेखन व दिग्दर्शन: दिग्पाल लांजेकर
️ तिकीट दर
Adult Members – 20 CHF
Non-Members – 25 CHF
Young Members (10–18 वर्षे) – 15 CHF
Young Non-Members (10–18 वर्षे) – 20 CHF
10 वर्षांखालील मुले – मोफत
️ खाद्यव्यवस्था
पावभाजी + गुलाब जामून – 18 CHF
बटाटा वडा (१ नग) – 4 CHF
चहा – 2 CHF
सहकुटुंब उपस्थित राहून स्वराज्याचा प्रेरणादायी वारसा आणि मराठमोळ्या संस्कृतीचा उत्सव एकत्र साजरा करूया!