Menu
Log in


Log in


११ मार्च - नमो गंगे

12 Mar 2022 12:21 AM | Deleted user

नमो गंगे,

नमो नमः

होती,आहे,

तशीच रहा

कोणी म्हणाले होते

तू हळवी आहेस,

मळली आहेस,पापं

धुवून,धुवून पाप्यांची

गंगे,

महान आहेस तू

अक्क्लच

कमी आहे बाप्यांची

अशीच वहात रहा

खळाळत,अशाच

वाहून नेत रहा,

साऱ्यांच्याच साऱ्या स्मृती

वाल्यांचे करत रहा वाल्मिकी

आम्हाला पावन तर करून घेतच रहा

कमी कशी होतील पापे आमची

हे देखील थोडे पहात रहा

तू,माता,तू भगिनी,

तुझ्या वाहत्या रूपातील

कधी मनमोहिनी,

सुखकारी,प्रलयंकारी कधी

तुझ्या विशाल पात्राच्या,

दोन्ही काठांवर

पाय घासत येणाऱ्यांनाही

तू थोडी पावणार कधी?

---श्रीपाद भालचंद्र जोशी