१२०० रहस्यकथा लिहिणारा ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झालीय असा अफलातून लेखक भारतात आणि तोही मराठी ?
रहस्यकथा खूप जण लिहितात. इंग्रजी भाषेत लिहिणारे ते वाचता येणाऱ्यानाच माहित असणार. मात्र, हे साहित्य मराठीत आणण्याचं १०० टक्के कठीण काम यशस्वी करणारे एकमेव लेखक म्हणजे बाबूराव अर्नाळकर. ‘चंद्रकांत सखाराम चव्हाण’! आईबापाचं छत्र अगदी लहानपणीच हरवल्यामुळं स्वारीला मुंबईच्या मावशीकडे आश्रय घ्यावा लागला होता. शिक्षण आणि नोकरीही मुंबईतच. तिथेच त्यांचं चष्म्याचं दुकान होतं. फावल्या वेळात रहस्यकथा लिहिण्याचं जबरदस्त वेड लागलं आणि त्यानंतर मागे वाळूनच बघितलं नाही. धनंजयमाला, झुंजारमाला, जयहिंदमाला, प्रफुल्लमाला अशा माला सुरू करून त्यातून दरमहा पाच-सहा कथा लिहिल्या. १४८० रहस्यकथा लिहिल्याने गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये अत्यंत सन्मानाने नोंद झालेले पहिले मराठी साहित्यिक. त्यांच्या वाचकांची दुनिया अमर्यादपणे महाराष्ट्रभर पसरलेली आहे.
अशा या रहस्यकथाकाराचे ५ जुलै १९९६ रोजी निधन झाले.
संदर्भ :
http://samirparanjape.blogspot.com/2017/01/baburao-arnalkar.html
http://prahaar.in/%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6-%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%85/