शास्त्रीय गायनात आवर्जून घेतले जाणारे नाव, प्रसिद्ध गायक, कलाकार वसंतराव देशपांडे यांना लहान पणापासून कलेची आवड होती. सातव्या वर्षापासूनच दिग्गजांकडून संगीताचे धडे त्यांना मिळाले. सुरवातीस २४ वर्षे नोकरीबरोबरच संगीताचीही उपासना त्यांनी चालू ठेवली. त्यानंतर पूर्णपणे संगीताला वाहून घेतले. ते उत्तम खास शैली असणारे शास्त्रीय संगीत गायक तर होतेच. त्याबरोबरच कट्यार काळजात घुसली मधले खांसाहेब विशेष लक्षात राहिले. ८० हुन जास्त चित्रपटांसाठी पाश्वगायन आणि काही चित्रपट भूमिकाही केल्या. १९८२ सालच्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्षही होते.
१९८३ साली त्यांचे ३० जुलै रोजी निधन झाले.
संदर्भ
https://www.marathisrushti.com/profiles/dr-vasantrao-deshpande/
https://www.dainikprabhat.com/dr-vasantrao-deshpande/