Log in


४ ऑगस्ट इतिहासात

4 Aug 2021 5:38 AM | Amol Sawarkar (Administrator)

१८९४:

तंत्रशुद्धता, रेखीवपणा आणि डौलदार भाषा या त्रिगुणांनी नटलेले कथालेखन केलेले ना. सी. फडके यांचा जन्मदिवस. त्यावेळच्या पूना कॉलेजात (आजचे स. प. महाविद्यालय), त्यानंतर दिल्ली, सिंध हैदराबाद, नागपूर, कोल्हापूर येथील महाविद्यालयांतून तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र आणि मानसशास्त्र ह्या विषयांचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले आणि कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजातून १९४९ मध्ये ते निवृत्त झाले. रत्नागिरी येथे झालेल्या १९४० सालच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान त्यांना मिळाला. १९६२ साली भारत सरकारने 'पद्मभूषण' किताब देऊन त्यांचा गौरव केला होता. त्यांनी काही चरित्रग्रंथांमधून चरित्रनायक आणि त्यांच्या कृती ह्यांचे रहस्योद्ग्राही विवेचन केले आहे. काही थोरांची चरित्रे त्यांनी खास विध्यार्थ्यांकरताही लिहिली.

संदर्भ

https://www.marathisrushti.com/articles/autograph-of-dfamous-marathi-author-na-si-phadke/

https://vishwakosh.marathi.gov.in/27520/