१२७४: संत निवृत्तीनाथ यांचा जन्म.
ज्ञानेश्वर, सोपानदेव मुक्ताई, निवृत्तिनाथ ह्या चार भावंडांमधे निवृत्तिनाथ हे थोरले होते. निवृत्तिनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरू होते. निवृत्तिनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना समजेल अशा शब्दांत लिहिण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका(ज्ञानेश्वरी) लिहून काढली.गैनीनाथ व गहिनीनाथ हे निवृत्तिनाथांचे गुरू होते. सुमारे तीन-चारशे अभंग आणि एक हरिपाठ एवढी रचना, निश्चितपणे निवृत्तिनाथांची आहे असे म्हणता येईल.. योगपर, अद्वैतपर आणि कृष्णभक्तिपर असे हे अभंग आहेत. रसवत्तेच्या दृष्टीने ते काहीसे उणे वाटतात; तथापि निवृत्तिनाथांची ख्याती आणि महत्त्व कवी म्हणून नाही, तर ज्ञानेश्वरांचे मार्गदर्शक म्हणून आहे.ज्ञानेश्वर आणि सोपानदेव समाधिस्थ झाल्यानंतर मुक्ताई ‘अन्नपाणी सकळ’ त्यागूनी परलोकवासी झाली, व पुढे लवकरच निवृत्तिनाथांनीही त्र्यंबकेश्वरी देह ठेविला. त्यांची समाधी तेथेच बांधण्यात आली आहे. निवृत्तिनाथांची पुण्यतिथी ज्येष्ठ शुद्ध द्वादशीला असते.
१९७५: इंडियन नॅशनल थिएटर निर्मित ती फुलराणी या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिर येथे झाला.
इंडियन नॅशनल थिएटर निर्मित आणि पु.ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या व दिग्दर्शित केलेल्या ’ती फुलराणी’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिर येथे झाला.
भक्ती बर्वें मुंजुळेची भूमिकेत नि सतीश दुभाषी प्रोफेसरच्या
पुलंच्या ‘ती फुलराणी’तील ‘फुलराणी’ काळानुरूप बदलत गेली. भक्ती बर्वे, प्रिया तेंडुलकर, सुकन्या कुलकर्णी आणि अमृता सुभाष, हेमांगी कवी अशानी ‘फुलराणी’ उभी केली. या सगळ्यांनी फुलराणी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली. ती फुलराणी हे पु.ल.देशपांडे यांनी जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या पिग्मॅलियन या नाटकाचे केलेले मराठी रूपांतरण आहे.
१९६३: लेखक व संपादक सदाशिव आत्माराम जोगळेकर यांचे निधन.
सदाशिव आत्माराम जोगळेकर यांचा जन्म बेळगाव येथे झाला. त्यांचे वडील, आजोबाही डॉक्टरच होते. आजोबांचा ग्रंथसंग्रह समृद्ध होता आणि सदाशिवला वाचनाची खूप आवड होती. आजोबांच्या मृत्यनंतर सदाशिव एकाकी झाले. त्यांना पुढील शिक्षणासाठी वडिलांनी पुण्यास पाठविले.जोगळेकर पेशाने वकील होते. तथापि लहानपणापासून त्यांचा ओढा साहित्याकडेच होता. ‘मॅझिनीची जीवन कहाणी’ आणि ‘मानवी कर्तव्ये’ या नावाने भाषांतराचा संग्रह प्रकाशित करून त्यांनी आपल्या लेखनाला सुरुवात केली. आरंभीच्या काळात अनेक नियतकालिकांशी ते संबंधित होते, पण लेखक आणि संपादक म्हणून त्यांचा बोलबाला झाला तो ‘यशवंत’ या मुख्यत: कथा साहित्याला वाहिलेल्या मासिकाचे त्यांनी संपादकत्व पत्करल्यावर. अखेरच्या काळात त्यांनी उत्तम रहस्यकथाही लिहिल्या. किंबहुना मराठीतील रहस्यलेखनाचे ते जनक मानले जातात.संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात त्यांनी लिहिलेला ‘संयुक्त महाराष्ट्र — महागुजरात’ हा ग्रंथ त्या दोन राज्यांच्या जडण-घडणीचा अद्ययावत ज्ञानकोश समजावयास हरकत नाही. ‘अहल्या आणि इतर कथा’ हा त्यांचा लघुकथा संग्रह आहे. त्यातील कथा अतिशय वेधक आहेत. ‘सूर्यफूल’ हा त्यांचा इतर कथांचा आणखी एक संग्रह, त्यांच्या मरणोत्तर तो प्रकाशित झाला. जोगळेकर उत्तम फोटोग्रफरही होते आणि दिलरुबा नावाचे वाद्यही उत्तम वाजवत असत. कामाच्या निमित्ताने त्यांनी कांजीवरमपासून पेशावरपर्यंत प्रवास करताना शेकडो प्राचीन नाणी जमवली व त्यांचा उत्तम संग्रहही केला होता.संदर्भ
https://www.santsahitya.in/mahati-santanchi/sant-nivruttinath/
https://maharashtranayak.in/jaogalaekara-sadaasaiva-atamaaraama