सार्वजनिक गणेश उत्सव स्वित्झर्लंड मध्ये सुरु होऊन जवळजवळ ३० वर्षे झाली. बर्न शहरात श्री.कोटणीस ह्यांनी सुरु केला ,त्यावेळेस मराठी फॅमिलीज खूप कमी होत्या . त्यांनी प्रयत्न करून जिनिव्हा ,झुरिक ,बाझल ,बर्न येथील महाराष्टीयन फॅमिलीज ना बोलावून त्यांचा घरी प्रथम आम्ही सर्व एकत्र होऊन पूजा केली.त्यांचा मुळे आमच्याआपापसात ओळखी झाल्या .नंतर दरवर्षी गणेशपूजा होऊ लागली .त्यावेळी जिनीव्हा ला फक्त चार-पाचच मराठी फॅमिलीज होत्या.परंतु आता थोडी संख्या वाढली आहे.आणि ह्या उत्साही मुलांनी प्रथमच जिनिव्हा मध्ये सार्वजनिक गणेश उत्सव करण्याचे धाडस केले आहे . ऑल द बेस्ट .
शामल रेगे