लेखिका : सौ मधुरा जेरे
आमच्या बाल्कनीत Egeli यायचे
सोफा ठेवलाय त्याच्या ख़ाली नित्य कर्म करुन ओम् च्या स्नो बूटात शिरायचे .
मला वाटले आमच्या बिल्डिंग मधे २ मांजरी आहेत त्या घाण करुन ठेवतात, म्हणुन सोसायटी मेम्बर्स ना मेल केला, तर समजले ते मांजर करत नाही. Egeli येते गवता मधले कीडे खाते आणि घाण करुन जाते.
मी दोन - तीन दिवस बघीतले पण कळायचेच नाही कुठून यायचे आणि जायचे.
एक दिवस ओम् च्या स्नो बूट हलतना दिसला मी कोचावर बसुन वाचत होते .
आधी घबरले असे कसे होतंय. मग डोकाऊन बघीतले तर हां काटेरी पहुणा आत बसलेला
बूट उचलुन पिशावित ठेवला आणि पिशवी गाठ मारून ठेवली
ओम् शाळेतून आल्यावर त्याला दखवले तर म्हणाला, आग आई हे Egeli आहे मांजर खाते याना म्हणुन लपले असेल. आपण पाळूयात का ? मी डोक्यावर हात मारला.
त्याला मी म्हणाले याला जंगलामधे सोडून देऊ. बादलीत बूट पालथा केला तर एकटं नाही तर दोघे होते
निवांत आमच्या गार्डन चे ground-worm चे भोजन करुन भोजनालय /शौचालय आणि स्नो बूट घर बनावले होते.
मग काय बादली घेऊन जंगल गाठले आणि सोडुन आले .
घरी ओम् अनय चिडले होते. छान pet होते आई ने सोड़ून दिले जंगलात आता मांजर खाणार त्याना मग मलाही वाईट वाटले खरे पण त्यांची दोघांची समजुत काढली कशीतरी.
मी म्हणाले अरे नाही ते जमिनीत बीळ करुन लपतात. इथे बुटात ठेवले असते तर चिडले असते ना
आशी ही इगेली कथा बाज़ल मधे सुफळ सम्पूर्ण