नमस्कार मंडळी
दरवर्षी प्रमाणे बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड आपला वार्षिक संक्रांति महोत्सव येत्या २२ जानेवारी २०२३ रोजी साजरा करीत आहे. बासेल मध्ये होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर लवकरात लवकर नोंदणी करा.
ह्या वर्षी मंडळ आपल्याकरिता घेऊन येत आहेत खास कार्यक्रम "श्री तशी सौ" - जोडीदारासोबत सामील व्हा आणि जिंका पैठणी , पुणेरी पगडी आणि अशी अनेक आकर्षक बक्षिसे.
कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे आहे.
१४:०० - गणपती पूजन व अथर्वशीर्ष पठण
१४:१५ - बोरन्हाण
१४:४५ - हळदी कुंकू
१६:०० - श्री तशी सौ
संक्रांतीचे वाण, बोरन्हाण व “श्री तशी सौ" ह्य खेळाचे योग्य नियोजन करण्याकरिता आपण लवकरात लवकर नोंदणी करावी हि नम्र विनंती
कार्यकारी मंडळ
बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड