बृहन महाराष्ट्र मंडळ स्विझर्लंड , दिपावली २०२४
नमस्कार मंडळी,
स्विझर्लंडमध्ये दिवाळी साजरी करण्यासाठी आम्ही सर्वजण उत्सुक आहोत. नैराश्येच्या , दुःखाच्या काळोखाला आनंदाच्या ,सुखाच्या दिव्यांनी उजळून टाकायला या दिवाळीला आपल्या सर्वांना एकत्र यायची संधी मिळणार आहे.
एवढेच नाही तर खाद्यपदार्थांचा आस्वाद व विविध वस्तुंच्या खरेदीचा लाभ घेण्यासाठी, आप्तजनांच्या भेटीसाठी तुम्हीही तयार आहात ना..!
प्रतिवर्षी प्रमाणे या वर्षीही झ्युरिच येथे खाली नमूद केल्या प्रमाणे दिवाळी साजरी होणार आहे. तेव्हा लवकरात लवकर नोंदणी करा.
तारीख : १९ ऑक्टोबर २०२४ ११:३० ते ५:०० वाजेपर्यंत
कार्यक्रम स्थळ : GZ Heuried – Zürcher Gemeinschaftszentren