Menu
Log in


Log in


मराठी भाषा गौरव दिन २०२४

  • 25 Feb 2024
  • 10:00 AM
  • To Be Decided

२७ फेब्रुवारी कवी वि वा शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस. हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे निमित्त साधून बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड तर्फे आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात मराठी भाषेशी संबंधित एखाद्या उपक्रमाची आणि संबंधित व्यक्तिमत्व यांची ओळख आपण करून घेतो.

यावर्षी आपले वक्ते आहेत प्रतिष्ठित इतिहासतज्ञ आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष प्रा. श्री. श्रीधर (राजा) दीक्षित.

त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे "विश्वकोश, मराठी भाषा आणि इतिहास"


रविवार २५ फेब्रुवारी २०२४.

स्विस वेळ सकाळी १० वा. (भारतीय वेळ दु २:३० वा.)

संचालन - सौ संध्या कुलकर्णी

झूम आणि युट्युब द्वारे. आपल्याला प्रश्न विचारण्याचीही संधी मिळणार आहे.

वेळ राखून ठेवा. आणि नक्की सामील व्हा.

Youtube link

https://youtube.com/live/NNvaRL-RKJM?feature=share