गणपती बाप्पा मोरया !!
श्रावण महिन्यापासून आपल्या सणवारांना सुरूवात होते आणि मग वेध लागतात ते गणेश उत्सवाचे!!
सण हे केवळ आनंद व ऊत्साहासाठी नसतात तर ते साजरे करण्यामागे आपली संस्कृती ,परंपरा, व परस्परांतील नाती संबंध याचे जतन व संवर्धन करण्याचाही हेतू असतो.
महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशऊत्सवाची परंपरा आपणही जपूया..
सालाबादप्रमाणे या वर्षीही आपण सर्व गणेशऊत्सव दणक्यात साजरा करण्यासाठी शनिवार दिनांक 6/9/25 रोजी जमणार आहोत..
तेव्हा लवकरात लवकर नोंदणी करा आणि या आनंदसोहळ्यात सहभागी व्हा..!!
सजावट ,पूजाअर्चा
ढोलताशा चा गजर ..
बाप्पाचे आगमन
राहू सारे जण हजर...
नमस्कार मंडळी ..
बृहन्महाराष्ट् मंडळ घेऊन येत आहे आपल्या सर्वांसाठी बाप्पाच्या आगमनाचा जल्लोषमय उत्सव !!!
आपण सर्व मिळून साजरा करणार आहोत गणेश उत्सव 2025