Menu
Log in


Log in


मकर संक्रांत कार्यक्रम - तुझी माझी जोडी जमली

  • 31 Jan 2026
  • 12:00 PM - 6:00 PM
  • Av. Villamont 13, 1005 Lausanne, Switzerland

Registration


Register

बृहन्महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंड (BMMS) आयोजित मकर संक्रांत कार्यक्रम - तुझी माझी जोडी जमली 


हळदी-कुंकू, बोरन्हाणाची गंमत, रंगतदार करमणुकीचे कार्यक्रम, जोडीदारासोबतची धमाल आणि पॉटलकमधील घरगुती सुग्रास जेवण — मराठी संस्कृतीचा हा आनंदोत्सव चुकवू नका!

आजच नोंदणी करा.

दिनांक :  शनिवार, ३१ जानेवारी २०२६

⏰ वेळ :  दुपारी १२:३० ते संध्याकाळी ६:००

ठिकाण: Av. Villamont 13, 1005 Lausanne, Switzerland


✨ कार्यक्रमाची रूपरेषा:


१२:३० – स्वागत

१:००   – हळदी-कुंकू, वाण आणि बोरन्हाण

१:३०   – पारंपरिक जोडीचा फॅशन शो 

२:३०   –  पॉटलक जेवण 

४:००   – जोडीदारांसोबत आणि लहान मुलांसाठी खास स्पर्धा

५:३०   – कार्यक्रमाची सांगता आणि आवराआवर


नोंदणी शुल्क (प्रति कुटुंब):

सभासद कुटुंब :  १० स्विस फ्रँक्स

इतर कुटुंब :  २० स्विस फ्रँक्स

पॉटलकसाठी महत्त्वाची सूचना:

पॉटलकमध्ये सहभागी होणाऱ्या कुटुंबांनी पदार्थांचे नियोजन करण्यासाठी दीप्ती पाटील (जिनेव्हा) आणि वृषाली केळकर (लौझान) यांच्याशी संपर्क साधावा.

पॉटलकमध्ये सहभागी होणे शक्य नसल्यास, प्रत्येकी १० स्विस फ्रँक्स अतिरिक्त शुल्क देऊन सहभागी होता येईल.

चला, कुटुंब आणि मित्रांसह मकर संक्रांतीचा हा सण एकत्र, आनंदात आणि मराठमोळ्या वातावरणात साजरा करूया !