Menu
Log in



मागील वर्षी गुढी पाडवा कार्यक्रमांतर्गत प्रायोजिक तत्वावर नवीन पिढीने आयोजित केलेल्या जल्लोष कार्यक्रमाच्या यशानंतर या वर्षी जल्लोष कार्यक्रम पूर्णपणे स्वतंत्र स्वरूपात सादर होत आहे. यात फक्त मनोरंजनाचे कार्यक्रम नसून, हस्तकला, शिल्पकला, आणि चित्रकला प्रदर्शन पण असेल.

कार्यक्रम ८-१८ आणि १८-३५ अशा दोन वयोगटातील नवीन पिढीच्या कार्यकर्त्यांनी पूर्णपणे आयोजित केला आहे. त्यांच्या प्रयत्नांना दाद देण्याकरता आणि त्यांचा मंडळातील सहभाग वाढवण्याकरता कार्यक्रम "हाऊस फुल्ल" करून त्यांचा सन्मान करावा असे आवाहन सर्वाना आहे.

आधिक माहिती आणि नोंदणी साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करा

जल्लोष - नवीन पिढी आणि तरुण तुर्क प्रस्तुती



२०२५ मधील इतर प्रस्तावित कार्यक्रम.

आपल्या तारखा आत्तापासूनच राखून ठेवा

१८ मे २०२५ - जल्लोष - नवीन पिढी आणि तरुण तुर्क प्रस्तुती झ्युरिक

१४/१५ जून २०२५ - वार्षिक सर्वसाधारण सभा (जिनिव्हा)

६/७ सप्टेंबर २०२५ - गणेश उत्सव जिनिव्हा, झ्युरिक