Menu
Log in


Log in


This section of articles is to collect the information referring to the history we should be proud about. The content will beadded with reference to the source and the contributing person name keep the credits. Note that following the organisational non-political stand, articles relating to politics may be avoided.

 • 26 Jun 2021 7:46 AM | Amol Sawarkar (Administrator)

  पु ल देशपांडे यांच्या पुढाकाराने जी वास्तू पुण्यात उभी राहिली, अनेक कलाकारांनी इथल्या रंगमंचावर कारकीर्द घडवली, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावले, एवढेच नव्हे तर अनेक कलाकारांना जन्म दिला. चोखंदळ पुणेकर रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यावर नाटकांना जागतिक उंची प्राप्त झाली ती वास्तू म्हणजे २६ जून १९६८ साली उदघाटन झालेले पुण्याचे बालगंधर्व रंगमंदिर.

  Balgandharva Rangmandir to celebrate 50 years anniv

  संदर्भ:

  https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/balgandharv-rangmandir-completes-50-years-on-26th-june/articleshow/59242414.cms

  https://pmc.gov.in/en/bal-gandharva-ranga-mandir

 • 24 Jun 2021 5:42 AM | Amol Sawarkar (Administrator)

  भारतीय सिनेसृष्टीत आपल्या नृत्याची अनोखी छाप सोडणाऱ्या लक्ष्मी छाया यांचा स्मृतिदिन – eNavakalजगावे की मरावे असा प्रश्न विचारताना शेक्सपिअरच्या हेम्लेटलाही अंचबित करेल, असा अप्पासाहेब बेलवलकर ज्यांनी मराठी रंगभूमीवर जिवंत केला, ते गोपाळ गोविंद फाटक. मात्र, या नावापेक्षा त्यांचे नानासाहेब फाटक हेच नाव लोकांच्या तोंडी जास्त झाले. मराठी रंगभूमीवरील त्यांचे नटसम्राट हे नाटक एवढे गाजले की त्यापुढे त्यांच्यामागे कायमच नटसम्राट ही उपाधीच लावली गेली. 

  या नानासाहेब फाटकांचा २४ जून १८९९ साली कोल्हापूर येथे जन्म झाला. 

  ‘पुण्यप्रभाव’मधील वृंदावन, ‘एकच प्याला’मधील सुधाकर, ‘झुंजारराव’ नाटकातील झुंजारराव आणि ‘हॅम्लेट’ या भूमिका त्यांच्या सर्वोच्च भूमिका आहेत. केंद्र सरकारने सर्वश्रेष्ठ नट म्हणून नानासाहेबांना गौरवचिन्ह अर्पण केले होते. त्यांच्याइतका भव्य, रुबाबदार, देखणा आणि ग्रेसफुल नट आजतागायत दुसरा कुणी झाला नाही.

  संदर्भ:

  https://www.marathisrushti.com/profiles/nanasaheb-phatak/

  https://www.mymahanagar.com/featured/obeisance-to-natshreshtha-nanasaheb-phatak/195828/

 • 21 Jun 2021 9:41 PM | Amol Sawarkar (Administrator)

  Baburao Pendharkar movies, filmography, biography and songs - Cinestaan.com

  सन १९२०, ऑलिम्पिक च्या कुस्ती स्पर्धेसाठी भारतातून पाठवण्याकरता झालेल्या चाचणी सामन्यांमध्ये यश न मिळाल्यामुळे सिनेमा क्षेत्राला आपले बनवून त्यात दिग्दर्शक व कलाकार म्हणू यश मिळालेली व्यक्ती म्हणजे बाबुराव पेंढारकर (भालजी पेंढारकर याचे बंधू). त्यादिवशी जर बाबुरावांची निवड ऑलिम्पिक साठी झाली असती तर कदाचित ब्रह्मचारी, महात्मा फुले हे मराठी चित्रपट झालेच नसते. याशिवाय ‘डॉ. कोटनीस की अमर कहानी’ ‘नवरंग’ ‘दो आँखे बारह हाथ’ ‘आम्रपाली’ हे हिंदी चित्रपट लोकप्रिय करण्यातही त्यांचा सहभाग अमूल्य होता.

  याच बाबुराव पेंढारकर यांचा २२ जून १८९६ हा जन्मदिवस.

  संदर्भ

  https://www.dainikprabhat.com/editorial-page-article-on-baburao-pendharkar/

  http://prahaar.in/baburao-pendharkar/

  https://bolbhidu.com/baburao-pendharkar-kusti/

 • 21 Jun 2021 5:59 AM | Amol Sawarkar (Administrator)


  २०१५: पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस

  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४सालच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत योग्य दिवसाचा प्रस्ताव मंडळ होता आणि तो जवळपास सर्व देशांच्या सदस्यांनी मान्य केला. त्याप्रमाणे २०१५ पासून दार वर्षी हा दिवस साजरा केला जातो. योग्य म्हणजे शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक साधना असून शारीरिक व मानसिक फायदे मिळवून देते. भारतात हजारो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेला आता जागतिक स्वरूप मिळाले आहे. २१ जून उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस असल्याने या दिवसाला योगाच्या दृष्टीनेही महत्व असल्याचे मानले जाते.

  संदर्भ: 

  https://www.un.org/en/observances/yoga-day

  https://www.pmindia.gov.in/mr/news_updates/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF/

 • 20 Jun 2021 9:55 AM | Amol Sawarkar (Administrator)

  १८९९: केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रायपॉस या गणिताच्या अंतिम परीक्षेत रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे पहिल्या वर्गात पहिले आल्यामुळे त्यांना सिनिअर रॅंग्लर होण्याचा बहुमान मिळाला.

  सन १९०० च्या आधी इंग्लंडमध्ये जाऊन तिथल्या प्रख्यात केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमधली ट्रायपॉस या गणिताच्या अंतिम परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणारे आणि त्यामुळे सिनिअर रँग्लर हि उपाधी मिळणारे पहिले भारतीय म्हणून रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे ऊर्फ रॅंग्लर परांजपे ओळखले जातात.

  त्यांच्यामुळे पाश्चात्त्यांमध्ये बौद्धिक श्रेष्ठत्वाच्या कल्पनेला पहिला धक्का बसला व पौर्वात्यांच्या बौद्धिक कार्यक्षमतेवर जगातील प्रगत राष्ट्रांतही विश्वास उत्पन्न झाला. हि घटना घडली १८९९ साली. आणि म्हणून या तारखेला ऐतिहासिक महत्व आहे.

  संदर्भ : https://vishwakosh.marathi.gov.in/20477/


 • 19 Jun 2021 7:14 AM | Amol Sawarkar (Administrator)

  १९३२: मराठी संतवाङमयाचे अभ्यासक आणि प्रचारक रेव्ह. जस्टिन एडवर्ड यांचे निधन

  जन्माने अमेरिकन, कर्माने अमेरिकन मिशनरी आणि ख्रिस्ती धर्म प्रचारक साप्ताहिकाचे संपादक राहिल्यानंतर निवृत्त झाले होते.

  मराठी संत वाङमयाने त्यांना भारावून टाकले. त्याचा परिणाम म्हणजे अमेरिकेत जाऊन परत भारतात आल्यावर मराठी संतांची वाणी मराठी न समजणाऱ्यांकरता त्याच साप्ताहिकात मराठी संत वाङमयावर इंग्रजीमधून लेखमाला सुरु केली. यातूनच त्यांनी १२ पुस्तके प्रकाशित केली. त्यांना महिपतीचा अमेरिकन अवतार असेही संबोधले गेले.

  आपला मृत्यू झाल्यावर अग्निसंस्कार करावेत अशी त्यांची इच्छा होती. याच संत वाङमयाचा अभ्यास करतानाच १९३२ साली त्यांचे निधन झाले.

  संदर्भ

  https://sahitya.marathi.gov.in/ebooks/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%20%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%99%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B6%20%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%20%E0%A5%A8.pdf

  https://www.marathisrushti.com/profiles/rev-justin-abbot-edward/

  https://data.bnf.fr/en/12534919/justin_edwards_abbott/

  https://whowaswho-indology.info/87/abbott-justin-edwards/


 • 18 Jun 2021 5:58 AM | Amol Sawarkar (Administrator)

  १८५८ : मणिकर्णिका तांबे ऊर्फ ’राणी लक्ष्मीबाई’ – झाशीची राणी – इंग्रजांचा पाठलाग टाळण्याच्या प्रयत्‍नात झालेल्या चकमकीत मृत्यूमुखी पडल्या

  मै अपनी झांसी नहीं दूंगी अशा स्फूर्तिदायक उद्गारांनी इंग्रजांविरुद्ध संघर्ष सुरु करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई.

  झांसी या राज्याच्या स्वातंत्र्यासाठी राणी लक्ष्मीबाईंनी ब्रिटिश राज्याविरुद्ध लढा देण्याचे धाडस केले आणि नंतर त्यांना वीरगती प्राप्त झाली. लक्ष्मीबाईं यांच्या पराक्रमाचे किस्से आजही आठवतात.

  राणी लक्ष्मीबाई यांनी त्याग आणि धैर्याने केलेल्या कृतीतून केवळ भारत देशच नाही तर संपूर्ण जगातील महिलांचे नाव गर्वाने उच्च केले.

  https://www.marathibiography.com/rani-lakshmibai-information-in-marathi/

 • 17 Jun 2021 5:23 AM | Amol Sawarkar (Administrator)

  १२९७: ज्येष्ठ गुरुसंत श्री निवृत्तीनाथ महाराजयांनी त्र्यंबकेश्वर येथे देह ठेवला.

  https://www.santsahitya.in/mahati-santanchi/sant-nivruttinath/

   

  १८९५: थोर समाजसुधारक गोपाल गणेश आगरकर यांचे निधन. 

  https://marathivishwakosh.org/4556/

   

  १९९६: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे निधन.

  https://www.tarunbharat.net/Encyc/2021/5/27/balasaheb-deoras-of-rss.html


 • 13 Jun 2021 9:34 AM | Amol Sawarkar (Administrator)

  *१९६९: आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचे निधन*

  महाराष्ट्रात असलेल्या बहुपैलू व्यक्तिमत्वांमधले एक असे नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते अशी ओळख असलेले आचार्य प्र के अत्रे यांचा स्मृतिदिन.

  मराठी भाषेवर वर्चस्व असले तरी इंगजी, संस्कृत भाषा आणि गणित असे विषयही त्यांनी शिकवले. मुख्याध्यापक म्हणून काम करताना त्यांनी शाळेचीही भरभराट केली. त्यांनी संपादनात भाग घेतलेली पुस्तके त्याकाळच्या अभ्यासक्रमातही होती.

  ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते. आचार्य अत्र्यांच्या घणाघाती भाषणांमुळेच संयुक्त महाराष्ट्र मिळाला असे मानले जाते.

  संदर्भ: 

  https://www.marathisrushti.com/profiles/pralhad-keshav-atre-alias-acharya-atre/

  https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A6_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B5_%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87

    • 12 Jun 2021 12:21 AM | Amol Sawarkar (Administrator)

  २०००: पु ल देशपांडे यांचे निधन

  ज्यांनी तीन पिढयांना खळखळून हसवलं ते महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व, विनोदी लेखक म्हणून प्रसिद्ध असले तरी, कवी, संगीतकार, प्रभावी वक्ते, उत्तम अभिनेते आणि निर्माते असे कला क्षेत्रातल्या सर्व आघाड्या सांभाळलेले पु ल देशपांडे यांचा स्मृतिदिन.

  संदर्भ: https://www.marathisrushti.com/articles/pu-la-deshpande/

  संदर्भ: https://marathi.webdunia.com/article/marathi-poets/%E0%A4%AA%E0%A5%81-%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87-107051400001_1.htm