Menu
Log in


Log in


आनंद पकडलेले क्षण - संध्या कुलकर्णी

20 Jul 2021 7:25 AM | Amol Sawarkar (Administrator)

भारतात खुप पाऊस झालाय... सगळीकडे पाणी तुंबलय.. तुंबलेल्या पाण्याला ऊतार हवा...तरच पाणी वाहून जातं.. निचरा होतो.. पण मनाचं काय..? मनात विचार तुंबले की ओसरण्यासाठी निचरा होणं गरजेचं असतं..मी आनंद पकडलेले क्षण असा लेख लिहला आहे...

आयुष्यात पकडलेले आनंदाचे क्षण व त्यातून निर्माण झालेली सकारात्मकता किंवा त्याला कारणीभूत ठरलेली सृजनशीलता या विषयी ...

नमस्कार मी संध्या कुलकर्णी

आज घरी मी एकटीच होते. खुप दिवसांनी निवांत संध्याकाळ गवसली होती. मस्त गझल ऐकत होते..

वक्त की कैद में जिंदगी है मगर,

चंद घड़ीयाँ यही है जो आझाद है..

इन को खोकर मेरी जाने जाँ

उम्रभर ना तरसते रहो..!!

खरंतर music ऐकणं माझी लहानपणापासूनची आवड. परीक्षा झाली की गाणी ऐकणं ही माझी enjoyment !. कारण मला त्यातून आनंद मिळायचा. relax व्हायला व्हायचं. recreation वाटायचं.

पण मधल्या काळात मला आनंद देतील , मन प्रफ्फुलित करतील असे क्षण कुठेतरी लपले होते किंवा मीच त्यांना खोल दडपून टाकलं होतं बहुतेक.

खरंच आनंद , सुख आपल्या हातात असतं..?? म्हणतात

Happiness is Within !!

You are responsible for ur own Happiness माझं मन खट्टू झालं. जर मी माझ्या आनंदाला जबाबदार असेन तर मधली ही वर्ष मी तो आनंद दुसर्‍यांमध्ये शोधण्यात , दुसर्‍याच गोष्टीत शोधत का वाया घालवली.. पण मनाला समजावलं हरकत नाही.... देर आये दुरूस्त आये...आता या पुढचं आयुष्य मात्र मनसोक्त जगायचं. स्वतःच्या आनंदाच्या पालखीचे भोई आपणच व्हायचं ..लोकांकडून अपेक्षा करायची नाही.

आणि मग चक्क मला आनंद देणार्‍या गोष्टींची list झरझर डोळ्यापुढे आली. खरंतर या गोष्टींवर कोणीच बंधनं घातली नव्हती पण मीच कुठेतरी मुरड घातली होती हे नक्की. तेही इतरांच्या आनंदासाठी. त्यातून त्यांना किती आनंद मिळाला ते माहित नाही पण कुठेतरी मी च माझ्यापासून , माझ्या व्यक्तिमत्वापासून दूर गेले हे नक्की. आणि तीच सल मला आनंदी होण्यापासून , सकारत्मकतेपासून दूर नेत होती याची जाणीव झाली.

काॅलेजमधल्या माझ्या कवितांच्या जुन्या वह्या काढल्या. वह्यांवरची धुळ झटकता झटकता मनावरची जळमटं दूर झाली. मित्रमैत्रीणींच्या आग्रहावरून काही लेख लघुकथा लिहल्या.नाटकं लिहली. त्यातून साहित्याविश्वात भर पडली नसली तरी मन समाधानी झालं. स्वतःचं मन समाधानी असण्यासारखा आनंद नाही..हुरूप वाढला..खरंच मनाला एक वेगळीच अनुभूती गवसली. घरी -दारी प्रोत्साहन मिळालं.

कविता करणं , रांगोळी , drawing , अभिनय, गाणी या सर्वांशी संबंधित कार्यक्रमांना जाणं हे सगळं सुरू झालं. मन रमायला लागलं. नकारात्मक विचार जावून सकारात्मकता वाढली. believe me त्याचा मानसिक आणि शारिरीक आरोग्यावर चांगला परिणाम झाला. छोट्या छोट्या गौण गोष्टींकडे कानाडोळा केल्यामुळे सृजनशीलता creativity वाढण्यास मदत झाली...

असा हा माझा प्रवास आनंदाच्या क्षणांना पकडण्याचा...मंडळी तुमचं काय..?

सौ. संध्या मिलींद कुलकर्णी...