आज आनंदे मला हे गीत वाटे गायचे,
कोरड्या रानी सुराचे मेघ हे वर्षायचे !
काल या वस्तीत होती घातकी कोल्हेकुई
आज शार्दुल गर्जनेने दुंदुभी गुंजायचे !
काल होत्या बोचणाऱ्या फार वाटा येथल्या,
हार तेथे मी फुलांचे पांघरूनी द्यायचे !
वाहती रे घाव ज्यांचे जख्म देती ते तरी,
येशुच्या माफीत त्यांना सावरूनी घ्यायचे !
आज मंगल काळ आला जिंकण्याला विश्व हे,
नाम ओठी राघवाचे नित्य माझ्या यायचे !
- श्रेयस जोगळेकर
#मराठीगझल